मला जेलमध्ये टाकले वा मारले तरीही मी परतणार – शेख हसीना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन वर्षांपासून हिंदुस्थानात असलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी डिसेंबरमध्ये बांगलादेशात परत  जाणार अशी घोषणा आज केली. मला जेलमध्ये टाकले वा मारले तरीही मी परतणारच असे व्हर्च्युअल भाषणाच्या माध्यमातून त्यांनी सांगितले.

25 मिनिटांच्या भाषणात त्या म्हणाल्या ‘मला माहीत आहे की, ते मला तुरुंगात टाकू शकतात किंवा माझी हत्याही करू शकतात, पण जनतेचा पाठिंबा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. फाशीची शिक्षा, खोटे गुन्हे आणि बनावट खटले मला घाबरवू शकत नाहीत. माझ्याविरुद्धची कायदेशीर कारवाई ही बेकायदेशीर, घटनाबाह्य आणि राजकीय हेतूने प्रेरित आहे.’ असे त्यांनी स्पष्ट केले.