डॅशिंग, एव्हरग्रीन अभिनेत्याची एक्झिट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

आपल्या डॅशिंग आणि सहजसुंदर अभिनयाने मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटसृष्टीचे ‘कमांडर’ ठरलेले ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. ‘एव्हरग्रीन’ अभिनेता ही ओळख असणाऱ्या भाटकर यांनी अखेरपर्यंत अभिनयाशी असलेली निष्ठा सोडली नाही. प्रकृती बरी नसतानाही अभिनयाचा ऑक्सिजन मिळवत काम सुरू ठेवले. अखेर आजाराशी दिलेली ही झुंज आज अपयशी ठरली. भाटकर यांच्यासारख्या सच्चा कलावंताच्या एक्झिटने अवघी इंडस्ट्री हळहळली आहे.

गेल्या वर्षभरापूर्वी रमेश भाटकर यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. आजारपणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. सध्या नेपियन्सी रोड येथील एलिझाबेथ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अशातच आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मृदुला भाटकर, मुलगा हर्षवर्धन आणि सून असा परिवार आहे. त्यांच्यावर रात्री शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या आधी त्यांचे पार्थिव मलबार हिल येथे घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

रमेश भाटकर अखेरपर्यंत अभिनय क्षेत्रात कार्यरत होते. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या हिंदी सिनेमात त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका साकारली. ही त्यांची अखेरची भूमिका ठरली.

रंगभूमी हेच पहिले प्रेम

रमेश भाटकर हे प्रसिद्ध संगीतकार-भजनसम्राट स्नेहल भाटकर यांचे चिरंजीव. त्यांचा जन्म 3 ऑगस्ट 1949 मध्ये झाला. अनेक चित्रपट, मालिकांमध्ये त्यांनी काम केले असले तरी रंगभूमी हे त्यांचे पहिले प्रेम. त्यांच्या अभिनयाच्या कारकीर्दीची सुरुकात रंगभूमीकरूनच झाली. ‘अश्रूंची झाली फुले’ हे त्यांचे नाटक किशेष गाजले. त्यामध्ये लाल्याची भूमिका त्यांनी अक्षरश: जिवंत केली. ‘केक्हा तरी पहाटे’, ‘अखेर तू येशीलच’, ‘राहू केतू’, ‘मुक्ता’ ही त्यांची काही गाजलेली नाटके. 1977 साली ‘चांदोबा चांदोबा भागलास का’ या चित्रपटाद्वारे भाटकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘अष्टविनायक’, ‘दुनिया करी सलाम’, ‘आपली माणसं’ यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. भाटकर यांनी अभिनय केलेल्या ‘माहेरची साडी’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले.

टीक्ही मालिकांमधील भाटकर यांच्या इन्स्पेक्टरच्या भूमिका लोकांच्या किशेष पसंतीस उतरल्या होत्या. ‘हॅलो इन्स्पेक्टर’, ‘दामिनी’, ‘बंदिनी’, ‘युगंधरा’, ‘कमांडर’ या त्यांनी अभिनय केलेल्या मालिका गाजल्या.

गेल्याच कर्षी मुलुंड येथे झालेल्या 98 क्या नाटय़संमेलनामध्ये रमेश भाटकर यांचा ‘जीकनगौरव’ पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला होता.