माजी गृह राज्यमंत्र्याच्या पीएकडून खेळाडूची फसवणूक

माजी मंत्र्याच्या पीएने तलाठय़ाची नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने खेळाडूची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजप नेते राम शिंदे हे गृह राज्यमंत्री असताना मनोज कोकाटे हा त्यांचा पीए होता. शिंदे यांना सांगून तुझ्या नोकरीचे काम करतो असे कोकाटेने त्या खेळाडूला सांगितले. याप्रकरणी सुमित या खेळाडूच्या तक्रारीवरून मनोज कोकाटेविरोधात माटुंगा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

2016 रोजी पुण्याला बास्केटबॉलच्या स्पर्धेवेळी तत्कालीन गृह राज्यमंत्री राम शिंदे यांचा पीए मनोज कोकाटे याच्याशी माझी ओळख झाली. त्यावेळेला तू बास्केटबॉल चांगला खेळतो, माझ्या साहेबांना सांगून तुला नाशिक, पुणे अथवा रायगड येथे मी तलाठी या पदाची नोकरी मिळवून देतो असे त्याने सांगितले. या कामासाठी कोकाटेने पाच लाख रुपये लागतील असे सांगितले होते. त्यानुसार कोकाटेला पैसे पाठविले. त्यानंतर त्याने टाळाटाळ केली. अशा प्रकारे कोकाटे याने नोकरी लावण्याच्या बहाण्याने माझी पाच लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार सुमित डबे याने केली.