निवृत्त झाल्यावर माजी सरन्यायाधीश गवई यांनी सोडली ही सरकारी सुविधा, नवा आदर्श केला प्रस्थापित

सोमवारी सूर्यकांत यांनी भारताचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनातील समारंभात न्यायमूर्ती सूर्यकांत यांना शपथ दिली. त्यांनी हिंदी भाषेत शपथ घेतली. या दरम्यान माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी निवृत्तीनंतर मिळालेली सरकारी सुविधा त्वरित सोडून एक नवा आदर्श प्रस्थापित केला.

माजी प्रधान न्यायाधीश बी. आर. गवई यांनी आपल्या उत्तराधिकारी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या शपथविधी समारंभानंतर त्यांच्यासाठी नियुक्त केलेली अधिकृत मर्सिडीज-बेंझ कार सोडून एक नवी परंपरा सुरू केली. 23 नोव्हेंबर 2025 रोजी निवृत्त झालेले न्यायमूर्ती गवई अधिकृत कारमधून राष्ट्रपती भवनात पोहोचले आणि समारंभानंतर स्वतःच्या खासगी वाहनातून परत गेले.

शपथविधी समारंभानंतर न्यायमूर्ती गवई यांनी नवीन सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यासाठी नियुक्त अधिकृत वाहन सोडले आणि राष्ट्रपती भवनातून दुसऱ्या कारने निघून गेले, जेणेकरून अधिकृत वाहन नवीन CJI यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी उपलब्ध राहील.