कश्मीरनंतर विदर्भ व मराठवाडा वेगळा करून महाराष्ट्र तोडण्याची भिती – अशोक चव्हाण

2141

‘सरकारने 370 कलम लागू केले, त्यासाठी प्रशासनाला 144 कलम लागू करावे लागले. त्यानंतर आता भिती वाटत आहे की विदर्भ आणि मराठवाडा वेगळा करुन महाराष्ट्र तोडण्याची भूमिका सरकारची आहे की काय, अशी शंका येऊ लागली आहे. मात्र आम्ही ते होवू देणार नाही’, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून सकारात्मक तसेच वेगवेगळ्या प्रश्नावर आवाज उठवून पत्रकारांनी समाजाची सेवा करावी, असे आवाहन त्यांनी केले. मराठी पत्रकार परिषदेच्या 42 व्या राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप त्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.

पत्रकारांच्या प्रश्नांवर सरकारचे असलेले धोरण घातक
पत्रकारांच्या प्रश्नांवर सरकारचे असलेले धोरण घातक असून, जाहीर केलेल्या योजनांसंदर्भात सरकारने घातलेल्या जाचक अटी या दुर्दैवी आहेत. त्यामुळे सरकारने पत्रकारांच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा जागरुकपणे विचार करावा, पत्रकारांना त्यांच्या न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे, ही बाब दुर्देवी असल्याचे मत राज्याचे त्यांनी येथे व्यक्त केले.

गेल्या दोन दिवसांपासून हे राष्ट्रीय अधिवेशन नांदेड येथे होत असताना वेगवेगळ्या विषयांवर, सोशल मीडियावर या अधिवेशनाच्या निमित्ताने चर्चा झाली. पत्रकारांचे प्रश्न गंभीर आहेत, सरकार घोषणा करते, मात्र त्यातील किचकट अटीमुळे अडचण येत आहे. त्यामुळे वृत्तपत्राबाबत सरकारचे धोरण घातक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पत्रकारांना आपल्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. ही दुर्देवी बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र तुमच्या या सर्व प्रश्नांबाबत मी आणि माझे सहकारी तुमच्या सोबत आहोत, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या