पोतले प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी निधी मंजूर, पृथ्वीराज चव्हाण यांनी केली पाहणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गावच्या वैभवात भर घालणार्‍या येथील पंतोजी मळ्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी  पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातुन 1 कोटी 24 लाख रुपये मंजूर झाले आहेत. तसेच येणके-पोतले पुलासाठी सुमारे साडेआठ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सदरची दोन्ही कामे वेगाने सुरू असून, प्रगतीपथावर असलेल्या या कामांची पाहणी पृथ्वीराज चव्हाण यांनी  केली.

यावेळी पोतलेच्या सरपंच वैशाली माळी यांचे हस्ते चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपकेंद्राच्या बांधकामासंदर्भातील सविस्तर चव्हाण यांनी माहिती घेतली. व अधिकार्‍यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी उपकेंद्रासाठी विना मोबदला जागा दिलेल्या शिवाजी जगताप व आनंद जगताप यांचा पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्कार केला. तसेच गावातील विविध विकासकामासंदर्भात चर्चा केली. यावेळी चव्हाण यांनी महत्वाकांक्षी येणके-पोतले पुलाच्या कामाची पाहणी केली. व तेथील जुना पूल पाडण्यासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा केली.