गेवराईत माजी नगरसेवकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेवराईतील माजी नगरसेवक मुकरम अखतरखॉ पठाण यांना विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला आहे. रविवारी सायंकाळी 5.30 वाजता त्यांच्या राहत्या घरी  ही दुर्घटना घडली. बीड जालना रोडजवळ असलेल्या त्यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरले होते. तळघरातील पाणी बाहेर काढण्यासाठी ते तळघरात गेले असता त्यांना विजेचा शॉक लागला. त्यांना तातडीने माणिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.  डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई,पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ ,बहिण असा परिवार आहे. त्यांचा दफनविधी सोमवारी होणार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.