संपूर्ण देशच आता कश्मीर झालाय, यशवंत सिन्हा यांची भाजप सरकारवर टीका

798

केंद्रातील सरकारने कश्मीरमधील परिस्थिती देशातील इतर भागांप्रमाणे सामान्य करू, असे म्हटले होते. मात्र, सध्याची परिस्थिती नेमकी उलट आहे. देशातील इतर भागांमधील परिस्थिती पाहता संपूर्ण देशच कश्मीर झालाय, अशा शब्दांत भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली आहे.

केंद्र सरकारने कलम 370 आणि 35 ए रद्द करून जम्मू-कश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतला. यामुळे कश्मीरमधील परिस्थितीत सुधारणा झाली नाही. उलट विरोधी विचारांना दडपण्याचे प्रयत्न या माध्यामातून केंद्रातील भाजप सरकारने चालविले आहेत. सीएए व एनआरसीच्या मुद्यावरून तर देशातील वातावरणच बिघडले असून संपूर्ण देशात कश्मीरसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी भीती यशवंत सिन्हा यांनी मंगळवारी दिल्लीच्या जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठाबाहेर बोलताना व्यक्त केली.

कश्मीरमधील शोपिया, बारामुला आणि पुलवामा या ठिकाणी तुम्ही गेलात तर तुम्हाला मोठय़ाप्रमाणात लष्करी बंदोबस्त दिसून येईल.  सध्या दिल्लीतही नेमकी हीच परिस्थिती असल्याचे सांगत जेएनयूत विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याकडे लक्ष वेधले. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दडपशाहीचे धोरण दिसून येईल. यापूर्वी दडपशाहीसाठी पोलिसांचा कापर व्हायचा, आता गुंडांचा कापर होत आहे. पोलीस निष्पापांना मदत करायची सोडून गुंडांना मदत करत आहेत. यामुळे देशात किचित्र परिस्थिती निर्माण झाल्याचे सिन्हा म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या