माजी खासदार राजू शेट्टी यांची कोरोनाने तब्येत बिघडली; उपचारासाठी पुण्याला हलवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर जिल्ह्यातील माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले आहे.

पाच दिवसांपूर्वी फुफ्फुसाची सौम्य लक्षणे आढळल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी घरातच आयसोलेट राहात उपचार घेणे पसंद केले. मात्र आज बुधवारी तब्येत जास्तच बिघडल्याने तातडीने त्यांना उपचारासाठी पुण्याला नेण्यात आले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांनी दुध दराबाबात आंदोलन केले होते. याच दरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यांसदर्भात त्यांनी एक पोस्टही लिहली होती आणि संपर्कात आलेल्याने तपासणी करून घ्यावी असे आवाहन केले होते.