Holi Tips – होळी खेळताय, अशी घ्या केसांची काळजी!

होळी हा सण सर्वत्र अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. रंगांची उधळण करायला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच उत्सुक असतात. पण ही मजा आपल्या केसांसाठी त्रासदायक ठरू नये यासाठी आवश्यक उपाययोजना आधीच करायला हव्यात. जराशी दूरदृष्टी आणि काळजी घेतली तर केसांचे नुकसान टाळू शकाल. रंग खेळल्यानंतर देखील केस चमकदार व निरोगी राहण्यासाठी या विशेष टिप्सचे पालन अवश्य करा.

होळीच्या आधी केसांची काळजी घ्या.

ओलसर केसांमध्ये रंग शिरण्याची शक्यता खूप जास्त असते, त्यामुळे होळीच्या एक दिवस आधी केसांना शॅम्पू करू नका.

होळी खेळण्यासाठी बाहेर पडण्याआधी केसांचे डीप कंडिशनिंग नक्की करा. यामुळे केसांना हायड्रेशन आणि संरक्षणाचा एक अतिरिक्त थर मिळतो, केसांना लागलेला रंग अधिक सहजपणे निघून जातो आणि केसांमधील नैसर्गिक तेलांचे नुकसान होत नाही.

होळीच्या आधी केसांची काळजी घेण्याची सुरुवात केसांना भरपूर तेल लावण्यापासून झाली पाहिजे. नैसर्गिक तेलाचा वापर करा कारण ते हलके, मऊशार असते आणि केसांवर एक संरक्षक आवरण बनून पसरून राहते. केसांच्या खालील त्वचेवर तसेच केसांवर सर्वत्र भरपूर तेलाने मसाज करा आणि तेल सर्वत्र नीट पसरले आहे याची खात्री करून घ्या.

रंग खेळायला जाताना केस मोकळे सोडू नका, बन किंवा वेणी घाला, त्यामुळे रंग कमीत कमी केसांपर्यंत पोचतात. केस सुरक्षितपणे बांधलेले असतील तर त्यामध्ये रंग अडकून राहत नाहीत, केस तुटण्याचा, त्यांचे नुकसान होण्याचा धोका कमी होतो.

होळीनंतर केसांची काळजी घेण्यासाठी:

रंग खेळून झाल्यानंतर केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. पाणी खूप गरम असेल तर केसांमधील नैसर्गिक तेल निघून जातात व केस कोरडे, निस्तेज होतात.त्यामुळे पाणी कोमट असावे.

केसांमधील रंग काढण्यासाठी आणि ते स्वच्छ करण्यासाठी सौम्य, सल्फेट-फ्री शॅम्पू वापरा. केसांवर शॅम्पू अतिशय हळुवारपणे लावा, जिथे रंग जास्त जमा झाला आहे तिथे जास्त लक्ष द्या.

शॅम्पू करून झाल्यानंतर केस पुन्हा सतेज व चमकदार व्हावेत यासाठी नरिशिंग मास्क लावा. कलर-ट्रीटेड केस स्वच्छ करण्यासाठी, विस्कटलेले केस नीट करण्यासाठी आणि केसांची चमक वाढवण्यासाठी डिझाईन करण्यात आलेला रिच फॉर्म्युला वापरा.

रंगांमधील हानिकारक केमिकल्समुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी डीप कंडिशनिंग ट्रीटमेंटचा वापर करा. केसांच्या टोकांकडे विशेष लक्ष द्या आणि भरपूर कंडिशनर लावा. केस पूर्णपणे धुण्याआधी त्यावर लावलेले कंडिशनर 15 ते 20 मिनिटे तसेच राहू द्या.

होळीनंतर लगेचच हीट स्टायलिंग करू नका, अशाप्रकारे तुम्ही केसांचे अजून जास्त नुकसान होण्यापासून टाळू शकाल. एअर ड्राइंग करा किंवा ब्लो ड्रायरवरील कूल सेटिंगचा वापर करा.

होळी खेळताना केसांचे नुकसान झालेले असेल किंवा केसांची टोके दुभंगलेली असल्यास केस ट्रिम करून घ्या.

शिल्पा हालदार जोशी, सिनियर सायंटिस्ट (हेयर), रिसर्च अँड इनोवेशन, लॉरियल इंडिया