नीरव मोदीच्या कोठडीत वाढ

285
nirav-modi-new

पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींचा चुना लावून देशाबाहेर पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदीच्या कोठडीत लंडनच्या वेस्टमिंस्टर कोर्टाने 28 दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे त्याचा कोठडीतील मुक्काम 19 सप्टेंबरपर्यंत वाढला आहे. नीरव मोदीला मार्चमध्ये अटक करण्यात आली होती तेव्हापासून तो वेंडस्वर्थ कारागृहात आहे. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याची कोठडी वाढवली. नीरव मोदीचे हिंदुस्थानात प्रत्यार्पण करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या