
सामना प्रतिनिधी । पुणे
पुण्यातील भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्यासह गणेश कामठे यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फायबर ऑप्टिक केबल टाकण्याचे काम करणाऱ्या कंपनीकडे 50 लाखाची खंडणी मागितल्याचा आरोप योगेश टिळेकर यांच्यावर करण्यात आला आहे.
कोंढवा परिसरात फायबर ऑप्टिक केबल टाकण्याची कामं सुरू होती. या दरम्यान गणेशोत्सवापूर्वी टिळेकर यांनी खंडणीसाठी अनेकदा फोन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या त्रासाला कंटाळून टिळेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. माहिती अधिकार कार्यकर्ते रविंद्र बराटे यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.
योगेश टिळेकर हे भारतीय युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष असून हडपसर विधानसभा मदतार संघाचे आमदार आहेत.
































































