रक्षाबंधनासाठी एसटीच्या जादा फेऱ्या

262

‘रक्षाबंधन’ सणासाठी एसटीने जादा फेऱयांची अनोखी भेट प्रवाशांना दिली आहे. 15 ते 18 ऑगस्टदरम्यान या जादा फेऱया चालविण्यात येणार आहेत.

रक्षाबंधनाला प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने आगारनिहाय स्थानिक पातळीवर जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे. या दिवशी भाऊ बहिणीकडे अथवा बहीण भावाकडे राखी बांधण्यास जाते. साहजिकच या दिवशी प्रवासी वाहतुकीची प्रचंड गर्दी होत असते हे ओळखून एसटीने यंदा आगार पातळीवर मार्गनिहाय जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. सुरक्षित प्रवासी वाहतुकीद्वारे प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी प्रमुख बसस्थानकावर प्रवाशांना मार्गदर्शनासाठी प्रवासीमित्र, तसेच रस्त्याच्या कडेला असणाऱया मार्गस्थ निवाऱयावर जादा वाहतुकीची माहिती देण्यासाठी एसटी कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या