पश्चिम रेल्वे फास्ट ट्रॅकवर, ‘लोकलकळा’ कमी होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

सामना प्रतिनिधी । मुंबई 

गुरुवार, 1 नोव्हेंबरपासून पश्चिम रेल्वेवर लागू होणाऱया नव्या वेळापत्रकात प्रवाशांना दहा जादा फेऱयांची भेट (चार विरार-डहाणू-2 अप आणि 2 डाऊन) मिळणार आहे, तर 42 फेऱयांचा विस्तार होणार आहे.

चर्चगेटहून सायंकाळी 6.51 वा. सुटणारी लेडीज स्पेशल भाईंदर लोकल आता विरारपर्यंत धावणार आहे. एकूण 42 सेवांचा विस्तार होणार असून त्यात अंधेरी आणि गोरेगावदरम्यान 40 फेऱयांचा विस्ताराचा समावेश असणार आहे. वसईहून सकाळी 9.56 वा. सुटणारी वसई रोड-चर्चगेट लेडीज स्पेशल आता विरारहून 8.44 वाजता सुटणार आहे. तसेच सकाळी सर्व डाऊन जलद लोकल (ऍण्टी पिक डायरेक्शन) चर्चगेट आणि मुंबई सेंट्रलदरम्यान जलद धावणार आहेत. याआधी केवळ विरार जलद सेवा चर्चगेट आणि मुंबई सेंट्रलदरम्यान थांबत नव्हती.

वातानुकूलित लोकलला सात थांबे!

पश्चिम रेल्वेवर धावणाऱया वातानुकूलित लोकलला सात अतिरिक्त थांबे मिळणार आहेत. मरीन लाइन्स, चर्नी रोड, ग्रॅण्ट रोड, दहिसर, मीरा रोड, नायगाव आणि नालासोपारा असे ते सात थांबे असणार आहेत. लोकलचे एकूण 45 वळणमार्ग कमी करण्यात आल्याने पश्चिम रेल्वेचा प्रवास वेगवान होणार आहे.

  वर्ष                 वाढ           एकूण सेवा

2014-15           –            1305

2015-16           –            1305

2016-17          18           1323

2017-18          32           1355

2018-19          10           1365