फेसबुक हॅक! 5 कोटी अकाऊंटवर सायबर हल्ला; view as फिचर बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

फेसबुकचे तब्बल पाच कोटी अकाऊंट हॅक झाले असून, युजर्सची माहिती लीक झाली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंदुस्थानातील अकाऊंट असल्याची भीती खुद्द फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनीच व्यक्त केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून फेसबुकचे view as हे फिचर अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे. केंब्रिज ऍनालिटीकाच्या डेटा चोरी प्रकरणानंतर फेसबुक पुन्हा आता वादाच्या भोवर्‍यात अडकले ओ. फेसबुकवरील युजर्सचा डेटा सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

9 कोटी युजर्सनी केले लॉगआऊट

सायबर हल्ल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून नऊ कोटी युजर्सना लॉगआऊट होण्याची सूचना फेसबुकने केली. पुन्हा अकाऊंट ओपन करण्यासाठी युजर्सने पासवर्ड बदलण्याची गरज नसल्याचे फेसबुकच्या अधिकार्‍याने सांगितले.  

अशी केली हॅकर्सने घुसखोरी

  • फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितले की, जगभरातील 5 कोटी अकाऊंटवर हल्ला झाल्याचे आमच्या इंजिनीअरिंग टीमने चार दिवसांपूर्वी शोधून काढले.
  • जगभरात फेसबुकचे 2 अब्ज युजर्स आहेत. हिंदुस्थानात सर्वाधिक 27 कोटी युजर्स आहेत.
  • फेसबुकवर अकाऊंटवर view as हे फिचर आहे. फिचर ओपन केले की प्रोफाईलची माहिती दुसर्‍या व्यक्तीला दिसते. फेसबुकने view as हे फिचर अनिश्चित काळासाठी बंद केले आहे.
  • फेसबुकसाठी हा गंभीर मुद्दा आहे. 5 कोटी अकाऊंट हॅक झाले आहेत. आणखी अकाऊंट हॅक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे.