… तर फेसबुकला 3,50,73,75,00,00 रुपयांचा दंड होऊ शकतो, वाचा काय आहे कारण?

108
facebook-friend-1

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया माध्यम फेसबुकला (Facebook) तब्बल 5 बिलियन डॉलर अर्थात 3,50,73,75,00,00 रुपयांचा दणका बसण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यात फेसबुकवरील युझर्सची गोपनीयता धोक्यात आली आहे आणि याच कारणामुळे फेसबुकला अब्जावधींचा दंड होण्याची शक्यता आहे.

फेसबुकवरील युझर्सची गोपनीयता धोक्यात आल्याप्रकरणी सध्या चौकशी सुरू आहे. फेडरल ट्रेंड कमिशन (एफटीसी) याच अनुषंगाने 5 बिलियन डॉलर अर्थात 3,50,73,75,00,00 रुपयांचा दंड ठोठावण्याची शक्यता असल्याचा अंदाज फेसबुकने व्यक्त केला आहे. फेसबुककडून एवढा मोठा दंड वसून झाल्यास तो कंपनीच्या एका महिन्यांच्या उत्पन्नाएवढा असेल. परंतु अद्याप एफटीसीकडून याबाबत कोणताही घोषणा करण्यात आलेली नाही.

फेसबुकने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, केब्रिज अॅनालिटिका डेटा स्कँडलनंतर फेसबुकची चौकशी सुरू असून या प्रकरणी कंपनीने एफटीसीसोबत सेटलमेंट करण्यासाठी 3 बिलियन डॉलर वेगळे ठेवले होते. 2011 मध्ये फेसबुककने एफटीसीसोबत एक करार केला होता आणि त्या अन्वये युझर्सच्या परवानगीशिवाय त्याची माहिती शेअऱ करणार नाही असे सांगितले होते. परंतु फेसबुकने या कराराचे उल्लंघन केल्याने सध्या चौकशी सुरू आहे. फेसबुकचे सीईओ डेव्ह वेनर यांच्या मते, या मुद्द्यावर तोडगा निघाला नाही तर दंडाची रक्कम किती असेल हे सांगता येत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या