फेसबुक-इंस्टाग्रामवरचा टाईमपास बंद करण्यावर इलाज सापडला

11

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सोशल मीडियावर एकदा ऑन झालेली व्यक्ती या चक्रव्युहात अशी अडकत जाते की, वेळ-काळाचे त्याला भान राहत नाही. अशा वेळी त्याला भानावर आणणारे आणि दिवसभरात सोशल मीडियावर किती वेळ आपण घालवला, हे दाखवणारे ‘टाईम मॅनेजमेंट टूल’ फेसबुक आणणार आहे. फेसबुकने आज याची घोषणा केली.  फेसबुक आणि इंस्टाग्राम मोबाईल अॅपवर हे टुल उपलब्ध करून देणार आहे. इंस्टाग्रामवर हे टूल ‘युअर  अॅक्टिव्हिटी’ नावाने तर फेसबुकवर ‘युअर  टाईम ऑन फेसबुक’ या नावाने ते टूल असेल.

काय असतील नवीन फिचर

युअर  अॅक्टिव्हिटी : यात किती वेळ सोशल मीडियावर घालवला ते समजू शकेल आणि दिवस किंवा महिन्याचा सरासरी वेळ समजू शकेल.

रिमाईंडर अॅलर्ट : जेवढा वेळ या सोशल मीडियावर घालवायचा आहे ती वेळ सेट करता येते. तेवढा वेळ झाला की, हे अॅप ग्राहकाला रिमाईंड (आठवण करून) देईल.

नोटिफिकेशन : किती वेळ मर्यादा आखून दिलेली आहे, याची माहिती देणारे संदेश येत जातील.

आपली प्रतिक्रिया द्या