धावत्या ट्रेनमध्ये महिलेची छेडछाड, फेसबुक लाईव्हमुळे आरोपीला बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धावत्या ट्रेनमध्ये महिलेची छेड काढणाऱ्या एका आरोपीला फेसबुक लाईव्हमुळे बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ही घटना पश्चिम बंगालच्या 24 परगना जिल्ह्यात घडली आहे.

येथील डमडम स्टेशनवर धावत्या लोकल ट्रेनमध्ये एका महिलेची छेड काढण्यात आली. पीडिता टॅटू आर्टिस्ट आहे. ती शनिवारी संध्याकाळी 6.30 वाजता नदिया जिल्ह्यातील फुलिया ते शांतिपूर-सियालदेह ट्रेनमधून प्रवास करत होती. ट्रेन डमडम स्थानकावर पोहोचेपर्यंत तिचा डबा पूर्ण रिकामी झाला होता.

दमलेल्या पीडितेला डुलकी येत होती. अचानक तिला लक्षात आलं की एका विकृत तरुणाने तिची छेड काढायला सुरुवात केली आहे. या तरुणाने तिच्याकडे पैसे देखील मागितले. तिने प्रसंगावधान दाखवून हा प्रकार मोबाईलच्या व्हिडीओमध्ये चित्रीत केला.

छेड काढल्यामुळे चिडलेल्या तरुणीने थेट फेसबुक लाईव्ह केलं आणि पोलिसांत तक्रार केली. तिने चित्रीत केलेल्या व्हिडीओमुळे तक्रार नोंदवण्यात आली आणि रेल्वे पोलिसांनी 32 वर्षांच्या एका तरुणाला अटक केली.