
देशात सर्वाधिक लोकप्रिय असणारी फेसबुक व व्हाॅटसअॅप भाजप आणि आरएसएसच्या नियंत्रणात काम करतात. सोशल मीडियातील या माध्यमांचा वापर समाजात द्वेष आणि खोट्या बातम्या पसरवण्यासाठी केला जात आहे. असे वृत्तांत ‘द वाॅल स्ट्रीट जर्नल’ने प्रसिद्ध केलं होत. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर देशभरातील अनेक लोकांनी फेसबुकच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यावरच फेसबुक इंडियाचे हेड अजित मोहन यांनी स्पष्टीकरण दिल आहे.
अजित मोहन याबाबत बोलताना म्हणले की, ‘फेसबुक सुरुवातीपासूनच एक खुले, पारदर्शक आणि निःपक्षपाती प्लॅटफॉर्म राहिले आहे. जिथे लोक स्वतंत्रपणे व्यक्त होऊ शकतात. कंपनी कोणत्याही प्रकारचे द्वेष आणि धर्मांधपणाचा निषेध करते. सोबतच कंपनी स्थानिक संवेदनशीलता पाहून अशा गोष्टींबद्दल धोरणात्मक निर्णय घेते,’ असे त्यांनी सांगितले आहे.
राजकीय वादावादीच्या कचाट्यात अडकलेल्या फेसबुकने एक ब्लॉग पोस्ट केले आहे. ज्यात फेसबुक इंडियाचे हेड अजित मोहन असे म्हणाले आहेत. या ब्लॉगमध्ये त्यांनी स्प्ष्टपणे सांगितले आहे की, ‘फेसबुक पक्षपात नसलेला प्लॅटफॉर्म आहे आणि समुदाय नियमांचे उल्लंघन करणारी पोस्ट हटवित राहील.’ ते पुढे म्हणाले, गेले काही दिवस कंपनीवर ‘आम्ही आमची धोरणे पक्षपाती पद्धतीने राबवित आहोत’, असा आरोप केला जात आहे. आम्ही हे आरोप गंभीरपणे घेत आहोत आणि हे स्पष्ट सांगत आहोत की, आम्ही कोणत्याही प्रकारच्या द्वेष आणि धर्मांधपणाचा निषेध करतो, असे ते म्हणाले आहेत.
























































