
घरच्या घरी फेशियल करायचा असेल तर यासाठी काही सोप्या टिप्स आहेत. सर्वात आधी चेहरा कोमट पाण्याने धुवा. बेसन, साखर आणि मध यांचे मिश्रण करून ते हलक्या हाताने चेहऱयावर लावा व हलक्या हाताने मसाज करा. नंतर कोमट पाण्याने स्वच्छ चेहरा धुऊन काढा. यामुळे त्वचा चमकदार होईल.
स्वच्छ छोटा टॉवेल गरम पाण्यात बुडवून तो टॉवेल चेहऱयावर ठेवा. स्टिममुळे त्वचा स्वच्छ आणि मुलायम होते. नारळ तेल किंवा ऑलिव्ह तेलाचा वापर करून चेहऱयाचा मसाज करू शकता. मसाजमुळे त्वचा तजेलदार होते. मध, दही, मुलतानी मातीचे एकत्रित मिश्रण करून ते चेहऱयावर वापरू शकता. चेहरा चमकदार होतो.