
पालिका अधिकारी आणि कर्मचारी असल्याचे भासवून व्यावसायिकाकडून पैसे उकळल्याप्रकरणी तिघांना खेरवाडी पोलिसांनी अटक केली. अमित कुळये, सुधीर पुजारी आणि विनोद सदर अशी त्या तिघांची नावे आहेत. तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. दोन दिवसांपूर्वी ते रिक्षाने अंधेरी येथून घरी जात होते. रिक्षा हंसभूग्रा जंक्शन येथे आली. तेव्हा मोटरसायकलवर असलेल्याने तक्रारदार यांना पालिका अधिकारी असल्याचे सांगून रिक्षा थांबवण्यास सांगितले. रिक्षात सिगारेट ओढत असल्याने 19 हजार 500 रुपये दंड भरण्यास सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने खेरवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. खेरवाडी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू करून आरोपींना अटक केली























































