शहरात 100 किलोचा बॉम्ब फुटणार; धमकीचा कॉल करणाऱया टेलरला बेडय़ा

मुंबई शहरात 100 किलोचा बॉम्बस्पह्ट होणार आहे असा पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा कॉल करणाऱया एका विक्षिप्त टेलरला गुन्हे शाखेने बेडय़ा ठोकल्या आहेत. त्याने याआधी 2018 मध्येदेखील दिल्लीत अशाप्रकारे धमकीचा कॉल केला होता.

रुक्साल मुक्तार अहमद असे त्या धमकीचा कॉल करून खोडासाळपणा करणाऱया कॉलरचे नाव आहे.  मालवणीच्या गेट नंबर 7 येथे राहणारा रुक्साल टेलरचे काम करतो. आज तो विमानतळावर गेला होता. त्यावेळी त्याने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पह्न करून मुंबईत 100 किलोचा बॉम्बस्पह्ट होणार असल्याचे सांगितले. याची तत्काळ दखल घेत गुन्हे शाखा युनिट- 10 ने तपास सुरू केला. सहाय्यक आयुक्त महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक दीपक सावंत यांच्या पथकाने तांत्रिक पद्धतीने तपास करून काही तासांतच रुक्सालला पकडले. रुक्साल हा मानसिकदृष्टय़ा अस्थिर असून 2018 मध्ये दिल्लीतदेखील त्याने धमकीचा कॉल केला होता. त्यामुळे दिल्ली पोलिसांतदेखील रुक्सालविरोधात गुन्हा दाखल आहे. दरम्यान, सात महिन्यांच्या कालावधीत मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा आलेला हा 33 वा कॉल आहे.