कोरोनाची चाचणी निगेटिव्ह तरिही गावकऱ्यांनी लावली दुषणं, शेतकऱ्याची आत्महत्या

1202
suicide

देशात कोरोनाचे चार हजारहून रुग्ण आढळले आहेत, तर 109 जणांचा मृत्यू झाला आहे. देश सध्या कोरोनाशी लढत आहे. परंतु लोकांच्या विचित्र मानसिकेतेशीही लढत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये एक शेतकरी कोरोना निगेटिव्ह निघाला. तरी ग्रामस्थांनी त्याला खूप टोमणे मारले. या जाचाला कंटाळून शेतकर्‍याने आत्महत्या केली.

हिमाचल प्रदेशमधील ऊना जिल्ह्यातील दिलशा मुहम्मदने तब्लिगी जमातच्या दोन प्रतिनिधींची भेट घेतली होती. नंतर कोरोना संदग्ध म्हणून त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याची कोरोना टेस्ट घेण्यात आली. सुदैवाने त्याची टेस्ट निगेटिव्ह निघाली. नंतर त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. ही बाब आख्ख्या गावाला कळाली. तेव्हा गावतील लोकांनी त्याला टोमणे मारायला सुरूवात केली. दुधवाल्याने त्याला दूध देण्यास नकार दिला. संपूर्ण गावात तुझ्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होईल असे लोकांने त्याला म्हटले.

नंतर दिलशाद घरी गेला. एका खोलीत त्याने स्वतःला डांबून घेतले. नंतर गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. गावकर्‍यांचा जाचाला कंटाळून दिलशादने हे पाऊल उचलले असा अरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या