गरिबीला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

1257

निलंगा तालुक्यातील नणंद या गावातील शेतकऱ्याने गरिबाली कंटाळून आत्महत्या केली आहे. दत्ता शिवाजी उजळंबे (35) असं या शेतकऱ्याचं नाव आहे. उजळंबे यांनी बुधवारी दुपारी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. सततची नापिकी, घरातील लोकांची जबाबदारी व आर्थिक विवंचना या दबावातून शेतामध्ये पत्र्याच्या शेडमधे लोखंडी तुळईला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.

शवविच्छेदनानंतर गुरुवारी 11 वाजण्याच्या दरम्यान त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उजळंबे यांच्याकडे सव्वा एकर कोरडवाहू शेत आहे. त्यांच्या पश्चात वृद्ध आई- वडील, अपंग बायको, 9 वर्षांचा मुलगा व 3 वर्षांची मुलगी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या