तिसऱ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरूच, पुणतांब्यातील शेतकरी कन्यांचे वजन घटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । शिर्डी

पुणतांबा येथील शेतकरीकन्यांनी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन आज तिसऱया दिवशीही सुरूच आहे. या आंदोलनामुळे शेतकरीकन्यांचे वजन घटू लागले आहे. पुणतांबा ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

दीड वर्षापूर्वी सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ आणि शेतकऱयांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ‘किसान क्रांती’च्या वतीने पुणतांबा येथे शुभांगी जाधव, पूनम जाधव, निकिता जाधव या उच्चशिक्षित शेतकरीकन्यांनी अन्नत्याग करून सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे.

‘‘आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. सरकारने आमच्याकडे लक्ष दिले नाही आणि काही बरेवाईट झाले तर त्याला सरकार जबाबदार असेल.’’