पुरात वाहून गेलेल्या शेतमजूराचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुलढाण्यातील देऊळगावराजा पाडळी शिंदे येथील रवींद्र दशरथ जाधव ( वय 53) यांचा मृतदेह शनिवारी सकाळी कपिला नदीच्या पूरात वाहून पूलावर असल्याचे आढळून आले. या घटनेची फिर्याद मृताचे भाऊ जालिंदर दशरथ जाधव यांनी अंढेरा पोलीस ठाण्याला दिली. यावरुन पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

रवींद्र दशरथ जाधव गुरुवारी दुपारी बकर्‍यांना पाला आणण्यासाठी गेले होते. ते रात्री उशिरापर्यंत घरी आले नाही. त्यामुळे पत्नी व मुलगा यांनी नातेवाईकांकडे शोधाशोध केली. मात्र, त्यांच्याबाबतही कोणतीही माहिती मिळाली नाही.  शनिवारी सकाळी 6 वाजता गावातूनच वाहणाऱ्या कपिला नदीच्या पूलावरील मोर्‍यात प्रेत अडकलेले नागरिकांना दिसले. ही माहिती अंढेरा पोलीस ठाण्यातील पोलीस पाटील भारत माणिकराव शिंदे यांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत ग्रामस्थांच्या मदतीने नदीच्या पूलावर अडकलेला मृतदेह बाहेर काढला. त्यांच्या पत्नीने त्यांची ओळख पटवली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.