सोयाबीन पिकाच्या नुकसानीमुळे महिला शेतकर्‍याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

855

अतिवृष्टीमुळे शेतातील सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील कारेगाव येथील महिला शेतकरी कमलाबाई प्रल्हाद केंधळे ( वय 55) यांना हृदयविकारचा तीव्र झटका आला. त्यामुळे शेतातील सोयाबीनच्या सुड्याजवळच त्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली.

कारेगाव येथील कमलाबाई प्रल्हाद केंधले या पावसाने उघडीप दिल्यानंतर मंगळवारी दुपारी 2 वाजता कारेगाव शिवारातील शेतात आल्या. पावसामुळे सोयाबीनचे अतोनात नुकसान झालेले पाहून त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने  सोयाबीन सुड्यांजवळच त्यांचे निधन झाले. घटनेची माहिती कारेगाव शिवारात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा सर्वे करणार्‍या तालाठ्यांना कळवण्यात आली. तलाठी राजेश जाधव यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केल्याची माहिती  उपस्थितांनी दिली. त्यांच्यापश्चात 2 मुले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या