शेतकरी कर्जमाफीची नगर जिल्ह्यातील पहिली यादी जाहीर

4168

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी सोमवारी जाहीर करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्यानंतर नगर जिल्ह्यातील पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे, नगर तालुक्यातील जखणगाव व राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी या दोन गावांची यादी प्रसिद्ध झाले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी दिली.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केला होता. कोणत्याही कागदपत्र विना सरसकट दोन लाखापर्यंत कर्ज माफीचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. सोमवारी याद्या प्रसिद्ध होतील असे त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार नगर जिल्ह्यातील 21,5000 शेतकरी या कर्जमाफीमध्ये पात्र होणार आहेत. पहिली यादी आज जिल्हा प्रशासन वतीने जाहीर करण्यात आली. यामध्ये नगर तालुक्यातील जखणगाव राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावातील यामध्ये समावेश आहे. यामध्ये जखणगाव 116 व ब्राह्मणी 856 असे एकूण 972 अशी पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

दरम्यान, नगर जिल्ह्यामध्ये शेतकरी कर्जमाफीचा विषय आता सुरू झाला असून जिल्हा सहकारी बँकेने प्रत्येक शाखेमध्ये कर्जदारांसाठी बायोमेट्रिक पद्धतीचा पहिल्यांदीच अवलंब केला आहे. राज्यातील ही पहिली जिल्ह्यात सहकारी बँक राहणार आहे

आपली प्रतिक्रिया द्या