कर्जवसुलीसाठी 3 वेळा दारात पोलीस आले, ज्योतिरादित्य शिंदेंसमोर शेतकरी भडकला

15

सामना ऑनलाईन । भोपाळ 

मध्य प्रदेशात कमलनाथ सरकारने शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केल्याचा मोठा गाजावाजा केला. मात्र या कर्जमाफीची एका शेतकऱ्याने भर सभेत पोलखोल केली. येथील गुना-शिवपुरी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार ज्योतिरादित्य शिंदे यांची सभा सुरू असताना शेतकऱ्याने त्यांच्या समोरच कर्जमाफी कशी फसवी आहे. कर्जाच्या वसूलीसाठी त्याच्या दारात 3 वेळा पोलीस आल्याचे सांगून कमलनाथ सरकारची पोलखोल केली.

मध्य प्रदेशातील गुना-शिवपुरी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार ज्योतिरादित्य शिंदे यांची शनिवारी सभा होती. त्यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर शिंदे बोतल असताना समोर बसलेल्या एका शेतकऱ्याला त्याचा राग अनावर झाला. ज्योतिरादित्य बोलत अतसाना तो पुढे येऊन बोलू लागला. ज्योतिरादित्य यांनी त्याला खाली बसण्याची विनंती केली व योग्य वेळी बोलायला संधी देण्याचे आश्वासन दिले. मात्र शेतकऱ्याने काहीएक न ऐकता आपल्या भावना कॅमेऱ्यासमोर व्यक्त केल्या. सत्तेत आल्यावर कमलनाथ सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज 10 दिवसांत माफ करण्याची घोषणा केली होती. मात्र सरकार येऊन 5 महिने झाले तरी अनेक शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या