
शेतकरी हा एक ब्रॅण्ड आहे, असे ठासून सांगणारा ‘नवरदेव, बीएस्सी. अॅग्री.’ हा मराठी चित्रपट 26 जानेवारी रोजी पडद्यावर येत आहे. तंत्रज्ञानाची साथ घेऊन शेतकऱयाने कितीही प्रगत शेती केली तरी आजही त्याला लग्नासाठी मुलगी मिळणे अवघड झाले आहे, असा आशय या चित्रपटात मांडण्यात आला आहे. राम खाटमोडे दिग्दर्शित व मिलिंद लडगे निर्मित हा चित्रपट शेतकऱयांच्या जीवनाचा आगळा पैलू हलक्याफुलक्या पद्धतीने उलगडून दाखवणार आहे. विशेष म्हणजे क्षितीश दाते, मकरंद अनासपुरे, प्रवीण तरडे, प्रियदर्शिनी इंदलकर, गार्गी फुले, रमेश परदेशी, हार्दिक जोशी, नेहा शितोळे, संदीप पाठक, तानाजी गळगुंडे यांच्या भूमिका आहेत. शेतकऱयांची व्यथा मांडणारे ‘रॅप साँग’ हे या चित्रपटाचे वैशिष्टय़ आहे. आता शेतकऱयाच्या भूमिकेतल्या क्षितीश दाते याला प्रियदर्शिनी इंदलकर ही नवरी म्हणून मिळणार की नाही, हे चित्रपट पडद्यावर आल्यावरच समजणार आहे.



























































