शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड, पक्ष्यांना उडवून लावण्यासाठी बनवले अनोखे यंत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाखरांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी काही ना काही उपाय शोधत असतात. अशातच एका शेतकऱ्याचा देशी जुगाड व्हायरल होत आहे. पाखरांना उडवून लावण्यासाठी शेतकऱ्याने अनोखे यंत्र तयार केले आहे. ते बघून नेटिझन्स शेतकऱयाचे कौतुक करताना दिसत आहेत.

 एका खांबामध्ये टिनचा पंखा दिसत आहे, जो वाऱ्यासोबत फिरत आहे. यासोबतच एक भांडेही बसवण्यात आले आहे, जेणेकरून वारा सुटला की, नट-बोल्टच्या सहाय्याने बसवलेला पंखा फिरू लागतो आणि त्यातून भांडे वाजू लागते. शेतकऱयाच्या या जुगाड यंत्रामुळे पक्ष्यांना पिकांपासून दूर ठेवता येणार आहे. एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर झालेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.