
केंद्र सरकारने निर्यातबंदी केल्याने कांद्याचा भाव प्रतिक्विंटल सहाशे रुपयांनी घसरल्याने जिह्यातील शेतकरी प्रचंड संतप्त झाले. लासलगाव, पिंपळगाव-बसवंतसह जिह्यात ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले. व्यापार्यांचा आडमुठेपणा आणि निर्यातबंदीच्या निर्णयाचा निषेध केला.
किरकोळ बाजारात कांद्याचे भाव वाढल्याने केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. यामुळे सोमवारी बाजार समित्यांमध्ये प्रतिक्विंटल भाव सहाशे रुपयांनी घसरले. घाऊक व्यापार्यांना पाचशे, तर किरकोळ व्यापार्यांना शंभर क्विंटल कांदा साठवणुकीची मर्यादा असल्याने व्यापार्यांनीही कांदा लिलाव बंद पाडले. संतप्त शेतकरी उमराणे, लासलगावसह पिंपळगाव-बसवंत, सायखेडा, उमराणे, विंचूर, चांदवड, सटाणा, नामपूर, करंजाड, कळवण, मनमाड आदी ठिकाणी रस्त्यावर उतरले. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली चांदवड येथे व्यापार्यांची बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
व्यापारी लिलावातून निघून गेले
मनमाड : सोमवारी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला सरासरी 3100 रुपये क्विंटल इतका भाव मिळाला. सोमवारी एक हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. 1100 ते 3385 सरासरी 3100 रुपये असा भाव होता. दरम्यान, या निर्णयाने कांदा उत्पादक शेतकर्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तर लासलगावमध्ये भाव कमी झाल्यानंतर कांदा उत्पादक संतप्त झाले व विचारणा करताच व्यापारी लिलावातून निघून गेले. त्यामुळे लासलगावचे लिलाव सकाळी पाच ते सहा वाहनांतील लिलाव पुकारण्यात आल्यानंतर बंद पडले.




























































