‘सत्तेची हवा डोक्यात गेली’, आरएसएस नेत्याचा केंद्रीय कृषीमंत्र्यांवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आरएसएस नेते रघुनंदन शर्मा यांनी केंद्राच्या तीन कृषी कायद्याविरूद्ध केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना लक्ष्य केले आहे. ते म्हणाले की, ‘सत्तेची हवा नरेंद्रसिंह तोमर यांच्या डोक्यात गेली आहे.’

मध्य प्रदेशमधील भाजपचे राज्यसभेचे माजी खासदार शर्मा यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये तोमर यांनी राष्ट्रवाद बळकट करण्यासाठी काम करावे, अशी सूचना केली होती.

आपल्या पोस्टच्या सुरुवातीला शर्मा यांनी लिहिलं की, ‘नरेंद्रजी तुम्ही सरकारचा अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग आहात. कदाचित आपला हेतू शेतकऱ्यांची मदत करण्याचा आहे, मात्र जर काही लोकांना मदत नको असल्यास असे करून काय फायदा आहे.?’ असं ते आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.