दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी शरद पवार मुंबईच्या रस्त्यावर उतरणार

केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात मागील 55 दिवसांपासून  नवी दिल्लीत शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मुंबईत रस्त्यावर उतरणार आहे. विविध स्वयंसेवी संस्थांच्या वतीने 25 जानेवारीला मुंबईत काढण्यात येणाऱ्या लाँगमार्चमध्ये शरद पवार सहभागी होणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज दिली.

नवी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील विविध संघटना व स्वयंसेवी संघटनांनी 23, 24 व 25 मार्च रोजी मुंबईत शेतकरी आंदोलन पुकारले आहे. या संदर्भातील माहिती नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले. या आंदोलकांचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटले. शरद पवार यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाचे आयोजक काँग्रेसच्या नेत्यांनाही भेटले काँग्रेसच्या नेत्यांनीही पाठिंबा दिला आहे. आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी होण्याठी 25 जानेवारील राजभवनावर काढण्यात येणाऱ्या लाँगमार्चमध्ये सहभागी होण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना  निमंत्रित केले आहे. शरद पवार यांनी होणार दिला आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या