
कृषी कायद्याविरोधात शेतकर्यांचे आंदोलन सुरू आहे. टिकरी सीमेवर आज दोन शेतकर्यांचा मृत्यू झाला आहे. एका शेतकर्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे, तर दुसर्या शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणारा शेतकरी काही दिवसांपूर्वीच आंदोलनात सामील झाला होता. मृत्यूपूर्वी या शेतकर्याने एक चिठ्ठीही लिहिली होती.
आज टिकरी बॉर्डवर 60 वर्षीय शेतकरी सुखमिंदर सिंह यांचा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. तर दुसरे शेतकरी कर्मवारी दरियाव सिंह हे मूळचे पंजाबचे रहिवासी होती.
दोन दिवसांपूर्वी ते आंदोलनात सहभागी झाले होते. पण काल रात्रीपासून ते खूप निराश झाले होते. आज अखेर एका बस स्टॉप जवळ एका झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.
या काळ्या कायद्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे मृत्यूपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. तसेच जोपर्यंत हा कायदा पूर्ण मागे घेतला जात नाही तोपर्यंत शेतकरी मागे हटणार नाहीत असेही त्यांनी चिठ्ठीत नमूद केले होते.
पोलिसांना माहिती मिळताच त्यांनीए घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सिंह यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला व पुढील तपास सुरू आहे.





























































