अकोले येथे शेतकऱ्यांचा सरकारविरोधात महामोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
किसान लाँग मार्चमुळे प्रसिद्धीझोतात आलेले अजित नवलेही मोर्चात सहभागी झाले होते

सामना प्रतिनिधी । अकोले

शेतमालाला योग्य दर, कर्जमाफी, दुधाचे दर वाढवणे, अशा विविध मागण्यांसाठी शेतकरी आजपासून १० दिवासाच्या संपावर गेले आहेत. राज्यात ठिकठिकाणी मोदी सरकारच्या धोरणांविरोधात शेतकरी बांधव रस्त्यावर उतरले आहेत. माकप नेते अॅड. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली अकोले-संगमनेरमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला.

‘शेतकऱ्यांच्या घामाला दाम द्या’, ‘दुधाचे दर वाढवा’, ‘शेतकऱ्याला कर्ज मुक्ती द्या’ अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला. या मोर्चात महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणावर होता.