कर्जबाजारी शेतकऱ्याची शिरोळमध्ये आत्महत्या

483

शिरोळ तालुक्यातील शिरढोण येथील वृद्ध शेतकरी तुकाराम रामू माने (वय 65) यांनी सोमवारी सकाळी आठ वाजण्यापूर्वी राहत्या घराशेजारील जनावराच्या गोठ्यातील सळईला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबतची माहिती विजय दादासो मगदूम यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

महापूर व अतिवृष्टीने तुकाराम माने यांच्या शेतीचे आर्थिक नुकसान झाले होते. त्यांना कर्ज झाले होते. या नुकसानीमुळे कर्ज कसे फेडायचे या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.  महापुराने ऊस शेतीचे आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर त्यांनी दोन वेळा ऊसलावणी केली होती. त्याचेही अतिवृष्टीने नुकसान झाले. गेल्यावर्षी त्यांच्या एकुलत्या एका मुलाचे अपघाती निधन झाले होते. त्यामुळे ते नैराश्यात होते. त्यांच्या पश्चात पत्नी, सून व दोन नातू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या