कर्जबाजारी झाल्याचे लेकीला सांगून शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपण कर्जबाजारी झालो असून कर्ज फेडू शकत नाही. या परिस्थितीने आपल्याल जगणे असहाय्य झाले आहे. त्यामळे आपण आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे, माझ्या अंत्यसंस्कारासाठी लवकर ये, असे मुलीला फोनवरून सांगत कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील वडवणीमधील चिंचोटी परिसरात घडली आहे.

‘गिताजंली तुझा बाप कर्जबाजारी झालाय,घेतलेले कर्ज फेडू शकत नसल्याने जगणे असहाय्य झाले आहे. त्यामुळे मी शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या करतोय. मातीला लवकर ये…असे सासरी असणाऱ्या मुलीशी मोबाईलवर बोलून कर्जबाजारीपणाला कंटाळून 42 वर्षांच्या शेतकऱ्यानी बोरीच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली असल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली आहे. या घटनेन चिंचोटी परिसरात खळबळ उडाली आहे.

बाळासाहेब लक्ष्मण गोंडे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तो चिंचोटी येथील रहिवासी आहेत. त्यांची पिंपरखेड शिवारातील पांढरी येथे दीड एकर शेती आहे. रात्री 9 वाजता घरातील मंडळीना शेतात जात आहे. गोठ्यावरच झोपणार आहे, असे सांगून ते मंगळवारी रात्री शेतात गेले. बुधवारी सकाळी 6 वाजता नादलगांव येथे दिलेल्या मुलीशी ते मोबाईलवरुन बोलले. त्यावेळी त्यांनी मुलीला कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करत असल्याचे सांगितले.

गिताजंली या त्यांच्या मुलीने तातडीने चुलत भाऊ कालीदास गोंडे यांना फोन करुन वडिलांनी सांगितलेली धक्कदायक घटना सांगितली आणि तुम्ही लवकर शेतात जा, अन्यथा अनर्थ घडू शकतो असे म्हणाली. त्यानंतर कालीदास गोंडे यांनी काही अंतरावर असलेला पुतण्या युवराज दिलीप गोंडे याला फोन करुन बाळासाहेब गोंडे यांच्या शेतात जा,तो आत्महत्या करत आहेत असे सांगितले. तू लवकर शेतात जा आणि आम्हाला फोन करुन सांगा, असे ते म्हणाले. ताताडीने युवराज गोंडे यांनी शेतात धाव घेतली. मात्र, बाळासाहेब गोंडे बोरीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना आढळले. त्यांनी कुंटुबियांना घटनेची माहिती दिली आणि एकच खळबळ उडाली.

वडवणी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह वडवणीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. बाळासाहेब गोंडे यांच्या पश्चात पत्नी,आई-वडील, अविवाहित एक मुलगी व दोन विवाहित मुलीसह 10 वर्षांचा एक मुलगा आहे.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.