
सामना प्रतिनिधी । लातूर
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील गणेशवाडी येथे कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मोजे गणेश वाडी येथील एकनाथ शिवाजी येमले ( 30) यांनी कर्जाला कंटाळून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



























































