शेतकऱ्यांना 25 हजार कोटींची गरज

319

राज्यात मराठवाडा, विदर्भ, उत्तर व पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा सर्वच जिह्यांतील शेती, फळबागांचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. राज्य सरकारने दहा हजार कोटी रुपयांची मदत जाहीर करून शेतकऱयांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आज भाजप सरकारवर हल्ला चढवला. उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱयांना मदतीची हात देण्यासाठी 25 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत देण्यात यावी आणि संपूर्ण पीककर्ज माफ करावे अशी मागणी त्यांनी केली.

राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेले शेतकऱयांचे नुकसान व शेतकऱयांना मदत करण्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अजित पवार यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला.

दोन दिवसांत राज्यपालांची भेट

विधिमंडळ पक्षनेते अजित पवार म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्ष मदत करणे आवश्यक आहे. मदत शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचली पाहिजे. आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱयांकडून प्रत्येक जिह्यातील नुकसानीची माहिती आम्ही मागवली आहे. त्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यपालांना भेटून निवेदन देणार आहोत. राज्य व केंद्र सरकारने शेतकऱयांना मदत करण्याची गरज आहे..

आपली प्रतिक्रिया द्या