
पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. अभाळाकडे डोळे लावून बसला आहे.पावसाआभावी डोळ्यादेखत पीके माना टाकून वाळून जात असल्याने आता लातूर येथील शेतकरी सोयाबीनवर नांगर फिरवित आहेत.
लातूर तालुक्यातील मुरूड अकोला येथिल सर्वे नं244 मध्ये शेख कलीम महेबुब ,शेख इस्माइल महेबुब यांनी सोयाबीन पेरले. प्रारंभीच्या पावसावर त्यांनी पेरणी केली खरी. परंतु पिकांवरपाऊस झाला नसल्याने पिकांची वाढ म्हणावी तशी झाली नाही. त्या पिकांवर शेख यांनी डोळ्यात पाणी आणून अडीच एकरवरील सोयाबीनवर नांगर फिरवला.

























































