पुण्यात रंगले पुश इंडिया पुश! शेतकर्‍याच्या पोराने मारल्या अडीच हजार जोर-बैठका!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेश मधील आग्रा येथील पाली गावातील फत्तेपूरचा रहिवास असणाऱ्या रामू जाट या शेतकर्‍याच्या पोराने ‘पुश इंडिया पुश चॅलेंज’ स्पर्धेच्या ठिकाणी तब्बल अडीच हजार बैठका मारल्या. पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात त्याने रविवारी हा पराक्रम केला.

घामाघूम झालेल्या या पोराला अखेर स्पर्धा आयोजकांनी थांबण्याची विनंती केली. आपण दिवसभर बैठका मारू शकतो, असे रामूचे म्हणणे आहे. त्याच्या या पराक्रमाबद्दल “पुश इंडिया पुश” या क्रीडा महोत्सवाचे आयोजक आदर्श सोमानी यांनी रामू जाट व त्याचे वडील बाबूलाल यांचा दहा हजार रूपयांचे पारितोषिक देऊन गौरव केला. रामू कुठल्याही जिममध्ये जात नाही. केवळ गावठी व्यायामाने त्याने आपले शरीर कमाविलेले आहे. त्याने अंगावरील कपडे उतरवून आपल्या आखीव-रेखीव व पिळदार देहयष्टीचे दमदार प्रदर्शन दाखवीत उपस्थित प्रेक्षकांची वाहवा मिळविली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)