
सामना प्रतिनिधी । साक्री
कांदा विकून कर्जाची परतफेड करण्यात अपयशी ठरलेल्या छाईल येथील शेतकऱयाने आज आपल्या शेतमळय़ात विष पिऊन आत्महत्या केली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शेतकरी सुनील कुवर (४६) यांनी गेल्या दोन वर्षांपूर्वी आपल्या मुलीचे लग्न केले. लग्नासाठी त्यांनी विमा पॉलिसीवर कर्ज काढले होते. यावर्षी कांदा लागवड करून येणाऱया उत्पन्नातून कर्जाची परतफेड करण्याचे त्यांनी ठरवले असताना कांद्याला चारशे साडेचारशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला. यातून उत्पादन खर्चही निघाला नसल्याने कर्ज फेडावे कसे अशा विवंचनेत ते होते. ८ जून रोजी स्वतःच्या मळय़ात विषप्राशन केले. धुळे येथील जिल्हा रुग्णालयात रात्रभर उपचार केल्यानंतर तब्येतीत सुधारणा जाणवू लागली. परंतु आज दुपारी त्यांचा मृत्यू झाला.

































































