फारुख अब्दुल्ला यांच्या नजरकैदेत 3 महिन्यांनी वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष व जम्मू कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या नजरकैदेत वाढ करण्यात आली आहे. अब्दुल्ला यांची नजरकैद तीन महिन्यांनी वाढविण्यात आली आहे. गेल्या साडे चार महिन्यांपासून फारुख अब्दुल्ला हे नजरकैदेत आहेत.

जम्मू कश्मीरमधून 7 ऑगस्टला कलम 370 हटविल्यापासून तेथील अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. फारुख अब्दुल्ला यांच्या सहीत माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना देखील त्यांच्या घरात नजरकेदैत ठेवण्यात आले आहे. तसेच अनेक नेत्यांना ताब्यात घेतल्याने सध्या जम्मू कश्मीर मधील तुरुंग भरलेले असून अनेक हॉटेल्सला तुरुंगाचे रुप देण्यात आले आहे.

लोकसभेत गेल्या आठवड्यात या नेत्यांची नजरकैदेतून कधी सुटका होणार याबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी त्यावेळी त्या नेत्यांच्या सुटकेचे अधिकार केंद्र सरकारला नसून जम्मू कश्मीरमधील प्रशासनाला आहेत. तेथील प्रशासनाला योग्य वाटेल तेव्हा त्या नेत्यांची सुटका करण्यात येईल असे सांगितले होते.