बॉलिवूडच्या गाण्यावर थिरकले फारुक अब्दुल्ला, पाहा हा जबरदस्त व्हिडीओ

जम्मू कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी नुकतीच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नातीच्या लग्नाला हजेरी लावली होती. त्यावेळी ते बॉलिवूडच्या गाण्यावर थिरकताना दिसले. त्यांचा नाचतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये 83 वर्षीय फारुक अब्दुल्ला हे ‘तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत कॅप्टन अमरिंदर सिंग देखील असून फारुख अब्दुल्ला त्यांना थिरकवण्याचा प्रयत्न करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या