जम्मू कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला ताब्यात, घराचाच झाला तुरुंग

2205

जम्मू कश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांना पब्लिक सेफ्टी कायद्याअंतर्गत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविवारी रात्री उशिरा हा निर्णय घेण्यात आला असून त्यांच्या घराचेच तात्पुरता तुरुंगात रुपांतर करण्यात आले आहे. दरम्यान त्यांचे मित्र व नातेवाईकांना त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.

जम्मू कश्मीरमधून 5 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव अनेक नेत्यांना व फुटिरतावाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फारुख अब्दुल्ला यांना देखील तेव्हापासून त्यांच्या घरातंच नजरकैदेत ठेवण्यात आले होते. तर त्यांचा मुलगा व माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला व माजी मुख्यमंत्री व पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांना ताब्यात घेण्यात आले होते.

जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटविल्यापासून जवळपास 50 नेत्यांना व अनेक फुटिरतावाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जम्मू कश्मीरमधील तुरुंग भरल्याने तेथील अनेक हॉटेलला तुरुंगाचे स्वरुप देण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या