फॅशन… काल, आज आणि उद्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साध्याशा पेहरावांमधूनदेखील ‘फॅशन’ अधोरेखित होते आणि माना वळवून समोरच्याच्या नजरेतून त्याचे प्रतिबिंब उमटते ती योग्य फॅशन…

तुम्हाला जर असा प्रश्न कुणी विचारला, तुम्ही काय करता? अर्थात तुम्ही कुङ्गल्या व्यवसायाशी निगडित आहात? तर त्याचे उत्तर काहीही असू शकेल – गृहिणी, विद्यार्थी, सरकारी किंवा खासगी कार्यालय, कर्मचारी, उद्योग व्यवसायाशीसंबंधित,
डॉक्टर, इंजिनीअर अगदी काहीही असो तुमचा व्यवसाय किंवा काम. अगदी काहीही न करता घरी आहात तुम्ही तरीही, पण त्याच त्याच रुटीनचा पंटाळा येणे अगदी स्वाभाविक आहे. दररोज तेच तेच कपडे, तेच खाणे किंवा एकसारखी वेशभूषा. या तुमच्या रुटीनपेक्षा वेगळे काय असू शकते तर राहणीमानातील बदल म्हणजे फॅशन. दररोजच्या कपडय़ांपेक्षा वेगळे व खास, मनाला आनंद देणारी, उभारी आणि उत्साह देणारी असते ती फॅशन. फॅशन जी तुम्हाला आत्मविश्वास देते, नवी ऊर्जा देते. सम सामायिक (रिलेव्हंट) राहण्यास शिकवते तीच फॅशन. याचा थोडा आणखी विस्तार करायचा म्हटल्यास साध्याशा पेहरावांमधूनदेखील ‘फॅशन’ अधोरेखित होते आणि माना वळवून समोरच्याच्या नजरेतून त्याचे प्रतिबिंब उमटते ती योग्य फॅशन. कपडेलत्ते, परिधान, आहार, जीवनशैली, पर्यटन सगळय़ाची फॅशन आहे. आपण सध्या फॅशन आणि त्याद्वारे निर्माण होणाऱया फॅशनबाबत बोलू.

फॅशन चित्रपटांतून समाजात पसरते की, समाजातून चित्रपटांकडे? पण असे अगणित चित्रपट आहेत ज्यातील नायक-नायिकांनी केलेल्या पेहरावांनी अनेक वर्षे समाजात तशाच पेहराव आणि फॅशनची लाट आणली. प्रत्यक्ष जीवनात अर्थात ऑफ स्क्रीन कलावंत फॅशनेबल राहतातच असे नाही.

मुंबई-महाराष्ट्र-देशात थंडीची जाणीव होऊ लागलीये. या ऋतूत कुङ्गले रंग, फॅशन इन आहेत याविषयी बॉलीवूड फॅशन डिझायनर नीता लुल्ला यांनी आपले मत मांडले. त्या म्हणतात, थंडीचे दिवस म्हणजे हा सीझन डार्क गहिरे रंग मुबलक प्रमाणात वापरण्यासाङ्गी अगदीच योग्य. एक तर दिवाळीनंतर लग्नसराईचे दिवस येतात. घाम येत नाही त्यामुळे सिल्कचे फॅन्सी कपडे वापरण्यासाङ्गी पर्वणी. वेस्टर्न कपडे किंवा ड्रेसवर लाँग जॅकेट किंवा फ्रेंच कोट घालणे सध्या ‘इन’ आहे. इंडियन कॉटनचे लाँग कुडते त्यासोबत पॅन्ट, हॅरॅम्स, पटियाला असे मिक्स अँड मॅच कपडे कुङ्गल्याही सीझनला कुङ्गल्याही वयाच्या महिलांना वापरता येतात. सध्या हॉट पिंक, ऑलिव्ह ग्रीन, फ्यूशिया, मॅजेंटा असे रंग वापरणे कुङ्गल्याही वयाला आणि वर्णाला सहज शोभून दिसतील. पेस्टल शेड्स नक्कीच प्रभाव पाडतील.

लग्नसराईत शरारा, लेहंगा, सिल्क साडय़ा आणि रिस्पेशन या संध्याकाळच्या कार्यक्रमासाङ्गी हेवी लुक देणारे ‘कॉर्सेट’ सुयोग्य. वेस्टर्न आणि इंडियन असे ‘फ्युजन’ ड्रेसदेखील मार्पेटमध्ये उपलब्ध आहेत. तुमची आवड आणि बजेट यावर फॅशन अवलंबून असते. तुम्ही अशी फॅशन केली पाहिजे ज्याने तुम्ही ‘कॉन्शस’ न होता तुम्हाला ‘सहज’ वाटले पाहिजे.
पूजा सामंत