नवरात्रौत्सवासाठी लगबग सुरू

अवघ्या दोन दिवसांवर नवरात्रौत्सव येवून ठेपला आहे. यामुळे सगळीकडे नवरात्रौत्सववाची लगबग सुरू आहे. त्यातच नवरात्राचा थेट संबंध गरब्याशी असल्याने तरुणाई उत्सुकता शिगेला पोहचली आहे. याच तरुणाईला डोळ्यासमोर ठेवत बाजारात चनिया चोलीला नवीन पर्याय उपलब्ध आहेत.

घागरा चोली 

चनिया चोली

विविध डिझाइनच्या  घागरा चोली बाजारात उपलब्ध आहेत. सिल्क , काॅटनच्या कपड्यांमध्ये घागरा चोली मिळतात . ह्या घागरा चोलींची किंमत बाजारात 1000 रूपयांपासून ते 15,000 पर्यंत आहे.

चनिया चोली

चनिया चोली

चनिया चोली  नवरात्रौत्सव मोठ्या प्रमाणात घातली  जाते . चनिया चोली  ही  सिल्क , कोॅटन या कपड्यांमध्ये बाजारात उपलब्ध आहेत . यांची किंमत 1000 रूपयांपासून सुरू आहे.

केडिया आणि ट्युलिप पॅंट

केडीया आणि टयुलिप पॅंट

सद्या बाजारात  नवनवीन  डिझाइनचे कपडे उरलब्ध आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे  केडिया आणि ट्युलिप पॅंट . हा प्रकार  नवीनच बाजारात आला असून ह्याची किंमत 2000 पर्यंत आहे. काॅटन मिक्स कपडा यात वापरला जातो.

केडिया कोटी आणि धोती सलवार

सफेद केडीया आणि धोती सलवार

नवरात्रौत्सव मध्ये जसं मुली  घागरा चोली  घालतात तसचं मुलं केडीया कोटी आणि धोती सलवार  घालतात. बाजारात  यांची किंमत 1000 पासून सुरू होते.

दागिने ,मोजडी, कडे 

दागिने , मोजडी , कडे

बाजारात कपड्यासोबतच विविध स्टाइल्सचे  दागिने ,मोजडी, कडे सुद्धा उपलब्द आहे. यांची  किंमत बाजारात  200 रुपयांपासून आहे.

आपली प्रतिक्रिया द्या