फास्ट टॅग लावा नाहीतर डबल टोल भरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरातील टोल नाक्यांवरील फास्ट टॅगला आता बिलकूल मुदतवाढ मिळणार नाही, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बजावले आहे. सोमवारी मध्यरात्रीपर्यंत वाहनांवर फास्ट टॅग लावावाच लागेल. तसे न केल्यास वाहनचालकांना टोलच्या दुप्पट रक्कमेचा दंड भरावा लागेल, असे आदेश सरकारने दिले आहेत. ज्यांच्या वाहनावर फास्ट टॅग आहे पण कामच करत नाही त्यांनाही दंडाला सामोरे जावे लागेल. फास्ट टॅगला दोन-तीन वेळा मुदतवाढ दिली होती, पण आता शक्य नाही असे गडकरी म्हणाले. सर्व टोल नाक्यांवर फास्ट टॅग सुविधा आहे याची आठवणही त्यांनी करून दिली.