धक्कादायक! बापाचा अल्पवयीन मुलीवर तीन महिने बलात्कार, मुलगी गरोदर

1458
प्रातिनिधिक फोटो

तमिळनाडूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बापाने आपल्या पोटच्या मुलीवर सलग तीन महिने बलात्कार केला आहे. त्यात पीडित मुलगी गरोदर राहिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे.

तमिळनाडूच्या नागापट्टीबम भागात एक ड्रायव्हर आपल्या कुटुंबासोबत राहत होता. अचानक त्याच्या मुलीची तब्येत बिघडली. तिला उल्ट्या व्हायला लागल्या. तिला डॉक्टरांकडे नेले असता ती गरोदर असल्याचे निष्पण्ण झाले. मग मुलीने आपल्या आईला सांगितले की तिच्या वडिलांने तीन महिने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या